Phoenix Maharashtra

नाली बांधकाम वर्क ऑर्डर त्वरित देण्याकरिता वंचितचे न.प. समोर ठिय्या आंदोलन

अकोट : गोरगरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले वंचित चे आकोट शहर उपाध्यक्ष समाजसेवक लखन इंगळे यांनी नगर परिषद मुख्यअधिकारी यांना निवेदन दिले वंचित चे लखन इंगळे यांच्या नेतृत्वात दि.23.नोव्हेंबर 2022 रोजी उपोषण केले असता उपोषणकर्ते उर्मिला भदे, वर्षा इंगळे सुरेश किरडे नारायण इंगळे यांनी उपोषण केले असता त्यावर लेखी पत्र न.प.आकोट यांनी देऊन उपोषण मागे घेण्यात आले होते व आंदोलन मुळे श्री कॉलेनी येथील निधी पंचेवीश लाख रुपये च्या जवळ पास मंजूर केला त्या कामाची वर्क ऑर्डर पेंडिंग असता कामाचे डिमांड लेटर देऊन कामाची वर्क ऑर्डर तोरीत देण्यासाठी लखन इंगळे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन दि.9 ऑक्टोबर 2023 रोजी केले व कामाची फाईल घेऊन संबंधित अधिकारी यांना तोरीत डिमांड लेटर वर सही करे पर्यंत जागेवरून नागरिक उठले नाही आंदोलन ची दखल घेत संबंधित अधिकारी वर्क ऑर्डर येत्या आठवड्यात घेऊन काम चालु करू असे लेखी लिहून लखन इंगळे व नागरिक यांनी संबंधित अधिकारी यांच्या कडून लेखी घेतले व निवेदन नगर परिषद मुख्यअधिकारी यांना दिले निवेदन देते वेळी आंदोलन कर्ते लखन इंगळे, नितीन तेलगोटे, नवनीत तेलगोटे, सुरेश किर्डे, वर्षा इंगळे, रेखा धोती, सारिका किर्डे व कॉलेनी येथील नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version