Phoenix Maharashtra

२ ट्रकची अमोरासमोर धडक ; २ गंभीर मलकापूर जवळील राष्ट्रीय महामार्गावरील घटना

मलकापुर : नागपूर मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री उशिरा दोन ट्रक अमोरासमोर भिडल्याने मोठा अपघात घडला यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून जखमींना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मलकापूर शहरा नजीकच्या रेल्वे पुलाजवळ कंटेनर आणि एका ट्रक मध्ये आमोरासमोर धडक झाली. या अपघातामध्येGJ 27 TD 2977 आणि MH 46 BM 7055 हे दोन ट्रक आमोरासमोर धडकले यामध्ये दोन्ही ट्रक मधील चालक गंभीरित्या जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना मलकापूर येथील सामान्य रुग्णालयात हलविले आहे या अपघातामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Exit mobile version