Saturday, June 21, 2025
No menu items!
spot_img
Homeसामाजिककाँग्रेसचे एक नेता आहे लहान पण स्वतःला मोठे समजतात- खा.इम्तियाज जलील

काँग्रेसचे एक नेता आहे लहान पण स्वतःला मोठे समजतात- खा.इम्तियाज जलील

बुलढाणा : 5 दिवसांपूर्वी मुंबई येथे माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहेमान यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात MIM चे खासदार इम्तियाज जलील,माजी मंत्री व काँग्रेस नेते आरिफ नसीम खान उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री खान यांनी आपल्या भाषणात MIM वर हल्ला करत खा जलील यांना उद्देशून म्हणाले होते की बिहार आणि पश्चिम बंगाल मध्ये निवडणूक का लढवली. असे म्हणताच त्या ठिकाणी MIM चे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलं होतं.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरात खासदार इम्तियाज जलील यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यात खा.जलील यांनी माजी मंत्री आरिफ नसीम खान यांचं नांव ना घेता त्यांना प्रत्युत्तर देत आपलं मन मोकळं केलं. ते म्हणाले की काँग्रेसचे एक नेता जे आहे लहान पण स्वतःला मोठे समजतात,आमदारकी हरलेले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments