Phoenix Maharashtra

बस नियमित वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थी आक्रमक

बस स्थानक येथून मोर्चा काढून आगर प्रमुखांना घेराव

Anc. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहराला मोठ्या प्रमाणात खेडेगाव जोडले असल्यामुळे शिक्षणासाठी खेड्यातून शहरात हजारो विद्यार्थी शाळा,महाविद्यालयासाठी बसने येत असतात.. मात्र गेल्या काही महिन्यांपासून खामगाव आगारामध्ये बसची कमतरता असल्यामुळे खामगाव तालुक्यातील नागापूर ते विहिगाव येथे तसेच खामगाव साठी येणाऱ्या बसेस या बंद करण्यात आल्या आहेत. बसेस शाळेच्या नियमित वेळेवर येत नसल्याने यामध्ये विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान सुद्धा होत आहे. तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाचा खर्च परवडत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान सुद्धा होत आहे. बसफेऱ्या नियमित वेळापत्रकानुसार सोडण्यात याव्या याबाबत विद्यार्थ्यांनी अनेक वेळा खामगांव येथील आगर प्रमुख यांना विनंती करून तसेच निवेदन देऊन सुद्धा बस नियमित सुरू करण्यात आल्या नाही. येत्या काळात विद्यार्थ्यांचे परीक्षा सुद्धा सुरू होणार आहेत त्यामुळे त्यावेळेस विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या फिरता अखेर आज विद्यार्थ्यांचा संयमाचा बांध फुटून आक्रमक भूमिका घेत 80 ते 100 विद्यार्थी यांनी खामगाव बस स्थानक ते बस डेपो पर्यंत पायदळ मोर्चा काढून आगार प्रमुख यांना बस फेऱ्या नियमित व वेळेवर सुरू कराव्या याकरिता निवेदन दिले. यावेळी अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले.

Exit mobile version