खामगांव : खामगांव विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य़ साधून “विकास काम पंधरवाडा” अंतर्गत खामगांव तालुक्यातील पिंपळगांव राजा येथील रु. 13 कोटीच्या पाणीपुरवठा योजनेचा व विविध विकास कामांचा भूमिपूजन खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या शुभ हस्ते सोहळा थाटात संपन्ऩ. यावेळी सभेला संबोधीत करतांना आमदार ॲड आकाश फुंडकर म्हणाले की, मतदार संघातील विकास कामे करतांना पक्ष, जात, धर्म न पहाता विकास कामे केली जातात. विकास कामे हे सर्वांसाठी असतात ते कोणत्याही एका पक्षाच्या, जातीच्या, धर्माच्या लोकांसाठी नसतात. त्यामुळे ही कामे करतांना कोणीही भेदभाव करु नये. खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी मागील पंधरवाडयात खामगांव तालुक्यातील ग्रामीण भागात खामगांव तालुक्यातील 107 गावातील 172 कामांचे रु.183 कोटी रुपयांच्या कामांचे भूमीपुजन करण्यात आले. या भूमिपूजन सोहळयातील कामांमुळे ग्रामीण भागातील चेहरा मोहरा बदलणार आहे.
मौजे पिंपळगांव राजा येथे 13 कोटी 35 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्ऩ झाला यामध्ये पोच रस्ता, पाणी पुरवठा योजना ई.कामांचा समावेश आहे. विकास पंधरवाडा कार्यक्रमाच्या निमित्ताने मतदार संघातील ग्रामीण भाग विकासापासून दूर राहणार नाही असे नियोजन करण्यात आले आहे. नागरीकांच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पिंपळगांव राजा येथील नागरीकांनी अतिशय उत्साहात आमदार आकाशदादा फुंडकर यांचे स्वागत केले. यावेळी विविध कार्यक्रमाचे भूमीपुजन खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाशदादा फुंडकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ़ कार्यकर्ते श्रीराम वानखडे, विशेष उपस्थिती म्हणून राज्याचे भाजपचे सोशल मिडीया सहसंयोजक सागर फुंडकर, प्रमुख उपस्थिती सरपंच शेख शाकिर शेख चांद यांची उपस्थिती होती, तसेच यासोबतच श्रीशरदचंद्र गायकी, सरेश गव्हाळ, डॉ एकनाथजी पाटील, माजी जी प सदस्य पुंडलिक बोंबटकर, सामाजिक कार्यकर्ते जुलकर नैन शेख चांद, बसंता तेलंग, यांची उपस्थिती लाभली. त्याच प्रमाणे ग्रामपंचायत पिंपळगांव राजा, कासारखेड ग्रामस्थांच्या वतीने, श्री संत गजानन महाराज मंदीर ट्रस्ट़च्या वतीने आ ॲड आकाश फुंडकर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील गागरीकांसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जुलकर नैन शेख चांद यांनी आ ॲड आकाश फुंडकर यांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, खोंडै गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरज दुबे यांनी मानले.
विकास कामे करतांना पक्ष, जात,धर्म यांचा भेद नको- आ.ॲड आकाश फुंडकर
