Phoenix Maharashtra

पाईपलाईन कंत्राटदार विरोधात मिर्झा नगर मधील नागरिकांचे परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन

बुलढाणा : गेल्या दिड वर्षांपासून मिर्झा नगरमध्ये नवीन पाईपलाईनचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे त्या परिसरात मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत.यामुळे आज मिर्झा नगर मधील नागरिकांनी नगर परिषदे विरोधात व विविध समस्यांच्या विरोधात बुलढाणा नगर परिषदेमध्यें ठिय्या आंदोलन केले आहे. दोन ते तीन दिवसात समस्यांचा निपटारा करा अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मिर्झा नगर मधील नागरिकांनी दिलाय आहे. तर पाईपलाईनसाठी रस्त्यामध्ये खोदलेल्या खड्ड्यामुळे काल हृदयविकाराचा झटका आलेल्या मिर्झा नगर मधील एक व्यक्तीला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय..यामुळे पाईपलाईन कंत्राटदाराविरोधात स्थानिक रहवासी संपतापले आहे. यामुळे स्थानिक रहिवाश्यांनी नगर परिषद गाठत पाईपलाईन टाकणाऱ्या कंत्राटदारा विरोधात कारवाईची मागणी केली आहे. तसेच पाईपलाईनसाठी खोदलेले परिसर त्वरित दुरुस्त करण्याची मागणी केली.शिवाय परिसरात करून केलेले अतिक्रमण देखील काढण्याची मागणी करण्यात आली

Exit mobile version