खामगाव : गुन्हेगारीवर त्वरित आळा घालता यावा व तात्काळ पोलीसांची मदत मिळावी यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक ११२ चा वापर करावा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी केले आहे. जनतेला तात्काळ मदत पोहोचविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. यासाठी संपूर्ण राज्यभरात ११२ हा एकच हेल्पलाइन नंबर कार्यरत असून नागरिक या नंबर वर संपर्क करून मदत मागू शकतात. मदत मागीतल्या नंतर कॉल तात्काळ दहा मिनिटात मदत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या हेल्पलाइन नंबरचे कॉल सेंटर नवी मुंबई येथे असून तेथूनच नागरिकांना पोलीसांची त्वरित मदत मिळवून देण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येते. तरी नागरिकांनी पोलीसांच्या मदतीची आवश्यकता असल्यास ११२ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन एएसपी थोरात यांनी केले आहे.
पोलीसांची तात्काळ मदत मिळवण्यासाठी टोल फ्री क्रमांक ११२ चा वापर करावा
