भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी म्हणून प्रसिद्ध !
खामगांव : शहरातील गडाची देवी म्हणून ओळख असलेली वामन नगर खामगाव जि. बुलढाणा येथील कासार समाजाद्वारा संचालित श्री कालिंका माता मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे. कालिंका ही विश्वाची माय समजली जाते. सृष्टीची जननी आहे. इथे येणारे भक्त़ आईला साकडे घालतात व आई त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण करते अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. श्री कालिंका देवी मंदिर ५ ते ६ दशकापासून असून मागील चाळीस वर्षांत अनेकांना देवीच्या कृपेचे अनुभव आले आहेत.पूर्वी नवरात्रीत वामन नगर येथे मंडपात मातीची मूर्ती स्थापन होत होती. तत्कालीन अध्यक्ष व कार्यकारणी मंडळाच्या पुढाकारातून व श्री विष्णुपंत रंगबाल यांनी न नफा नुकसान हे तत्वावर नाम मात्र किमतीत मंदिरासाठी जागा दिली, देवासाठी/धर्मासाठी काही करावं या उदात्त हेतून स्व.रंगभाल यांनी ही जागा दिली त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. त्यामुळे आज ही मंदिराची भव्य वास्तू उभी आहे आणि वसंतपंचमीला या ठिकाणी आई कालिंकादेवी विराजमान झाली. पूर्ण श्रद्धेने मनापासून जी इच्छा मागणार ती इथे पूर्ण होत असते असे भक्तांचे अनुभव आहेत म्हणून दरवर्षी नवरात्रीत आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून भक्त आई कालिंका देवी चरणी लिन होतात. दरवर्षी कासार समाज बांधव व महिला मंडळ प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने पार पाडत असते, विविध स्पर्धा घेतल्या जातात. दरवर्षी कुमकुमार्ज्नचा मोठा कार्यक्रम घेतला जातो यात शहरातील महिला भाविक मोठया संख्येत सहभागी होतात. धार्मिक आणि सामाजिक दायित्व जपणारे हे संस्थान असून श्री कालिंका देवी मंडळाच्या वतीने गेल्या महिन्यात जळगाव जामोद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी ग्रस्ता साठी २०० साड्या व वस्त्र देऊन संकटग्रस्त जामोदकाराच्या मदतीला धावले होते. श्री कालिंकादेवी मंडळ हे वेळोवेळी लोकांना मदत करीत असते. या समाजातील सर्व लोक एकजुटीने काम करतात समाजातील कुणावर अन्याय झाला तर एकजुटीने उभे राहतात व अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात. “एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ ” या उक्ती प्रमाणे समाज काम करतो. नवरात्रीमध्ये दररोज रात्रो 8.30 वाजता मोठया मनोभावे आरती केल्या जावे मोठया संख्येने शहरातून तसेच वामन नगर व परिसरातील भाविक भक्त़ सहभागी होतात. श्री कालिंका देवीचे दर्शन घेऊन नवी ऊर्जा, आनंद आणि उत्साहाने भाविक भक्तांना मिळतो.