खामगांव : येथील सिल्वरसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, क्रिटिकल केअर व ट्रामा सेंटर जलंब रोड, खामगाव येथे दि १३ ऑक्टोबर २०२३ रोजी ८१ वर्षाचा रुग्ण भरती होते त्यांना सुप्रसिद्ध हृदय रोग तत्न डॉ. प्रशांत कावडकर हे उपचार करीत असताना रुग्णाच्या काही तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये रुग्णास रक्त द्यावे लागणार असे निष्पन्न झाले. रुग्णाचा रक्त गट ‘O’ Rh, positive असा होता त्यासाठी Lab टेक्निशिअन पार्थ काकडे याने येथील ब्लड बँकेत क्रॉस match करून बघितले पण ते न झाल्यामुळे त्याने Pathologist व Blood bank Incharge डॉ. ब्रहमानंद टाले सर यास पाचारण केले रक्ताच्या पुढील तपासण्या करून सराच्या असे लक्षात आले कि सदरील रक्त हे बॉम्बे ब्लड ग्रुपचे आहे जे कि अतिशय दुर्मिळ आहे व त्या रुग्णास त्याच गटाचे रक्त लागते डॉ. ब्रहमानंद टाले सर यांनी अंतिम तपासणी करिता ते रक्त छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथिल दत्ताजी भाले रक्त पेढीस पाठविले व तिथून अंतिम अहवाल आला कि ते बॉम्बे ब्लड ग्रुपचे आहे. नंतर रुग्णास त्याच गटाचे रक्त देण्यात आले. अश्या रक्त गट असणार्या रुग्णाचे रक्त गट लगेच लक्षात येत नाही त्यासाठी खूप जटील तपासण्या कराव्या लागतात आणि त्या आपल्या खामगाव मध्ये सिल्वरसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून होत आहे अशी माहिती सिल्वर सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे कार्यकारी अधिकारी डॉ पराग महाजन यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
रक्तपेढी मध्ये दुर्मिळ अश्या बॉम्बे ब्लड ग्रुपचे निदान
