खामगांव : जागृत देवस्थान श्री कालिंकादेवी मंदीर वामन नगर खामगांव येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यांतर्गत आज शुक्रवार दि.20-10-23 रोजी सामुहिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सामुहिक महाआरतीत मोठया संख्येने महिला व भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन खामगांव कासार समाज महिला मंडळ अध्यक्षा सौ रुपाली संजय वाघ यांनी केले आहे. आज शुक्रवार दि.20/10/2023 रोजी आरतीची वेळ रात्री ८.२० वाजता जागृत देवस्थान श्री कालिंकादेवी मंदीर वामन नगर खामगांव येथे सामुहिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या सामुहिक महाआरतीस खामगांव शहरातील महिला भगिनींनी तसेच भाविक भक्तांनी मोठयासंख्येत सहभागी व्हावे. सदर महाआरतीसाठी पुजेचे ताट दिवा, व आरती घरूनच सर्व साहित्य घेऊन यावे. सामुहिक महाआरतीस महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसून यावे. तसेच या सामुहिक महाआरतीस भाविक भक्तांनी सहकुटूंब सहपरिवार मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन खामगांव कासार समाज महिला मंडळ अध्यक्षा सौ रुपाली संजय वाघ यांनी केले आहे.
जागृत देवस्थान श्री कालिंकादेवी मंदिरात आज सामुहिक महाआरती
