दिवाळीपूर्वी सर्व प्रकरणे मार्गी लावण्याचे दिले आदेश
आज दिनांक 20 ऑक्टोंबर 2023 रोजी शासकीय विश्राम गृह नांदुरा येथे जिगांव प्रकल्पा संदर्भात बैठक माननिय आमदार श्री.राजेशभाऊ एकडे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये पुढील प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश आमदार महोदयांनी संबंधीतांना दिले. दादगांव :- घरांच्या अवार्ड मधुन सुटलेले ओरीजनल आठ अ असलेल्या घरांचा मोबदला दिवाळी पर्यंत देण्यात यावा असे आदेश कार्यकारी अभियंता जिगांव धरण व पुर्नवसन विभाग , शेगांव यांना आमदार राजेश एकडे यांनी दिले. अतिक्रमीत यादीतुन जी घरे सुटलेले आहे त्यांनी वैयक्तीक अर्ज शेगांव पुर्नवसन कार्यालयात दाखल करावे. त्यांना सुध्दा मोबदला पाहणी करुन देण्यात येईल. संयुक्त मोजणीत असलेले परंतु कलम 11 मधुन सुटलेले 26 गट सध्या शेतीला 15 कलम चालु आहे. ते 15 कलम रद्द करुन एकत्र संयुक्त मोजणी करुन पुन्हा कलम 11 लावण्यासाठी भूसंपादन अधिकारी यांचेशी चर्चा करुन नियमात बसत नसेल तर सुटलेल्या 26 गटाचा वेगळा प्रस्ताव सादर करुन त्यांना कलम 11 लावून अगोदरच्या 15 कलम चालु असलेल्या शेतकऱ्यांच्या अगोदर संयुक्त मोजणी करुन मोबदला देण्यात येईल असे कार्यकारी अभियंता हजारे साहेबांनी आश्वासन यावेळी आमदार महोदयांना दिले.
येरळी :- शेतीचा अवार्ड होवून दोन महीने झाले परंतु निधी अभावी रखडला होता तरी निधीची पुर्तता करुन दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश आमदार महोदयांनी दिले.
जिगांव :- अतिक्रमीत 256 घरांचे अंदाजपत्रकास तांत्रीक मान्यता लवकर घेवून त्यांना मोबदला लवकर देण्याचे आदेश दिले. तसेच घरकुलांचा प्रश्न सुध्दा मार्गी लावण्यात यावा याबाबत सुचना देण्यात आल्या.
पातोंडा :- पातोंडा, कोदरखेड, मामुलवाडी येथे नवीन तात्पुर्ती पाणी पुरवठा योजना 15 दिवसानंतर चालु करण्याचे श्री. हजारे साहेब यांनी आश्वासन दिले, तसेच बेलाड नवीन पुर्नवसनवरुन फिल्टर पाणी अलमपूर एमडीआर मध्ये टाकुन ते पाणी पातोंडा, कोदरखेड, मामुलवाडी, जिगांव,खरकुंडी या पाच गावांना पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात येईल असे यावेळी ठरले.
तसेच पातोंडा नवीन पुर्नवसन मध्ये झालेली पाईप लाईन, हायमास्ट लाईट, इलेक्ट्रीक कामे कंत्राटदार यांनी त्वरीत दुरुस्ती करावी असे कडक निर्देश आमदार महोदयांनी संबंधीतांना दिले.
प्लॉटचा कब्जा रक्कम :- जिगांव प्रकल्पातील घरांचा प्लॉटचा कब्जा रक्कम जलसंपदा विभाग जिल्हाधिकारी कार्यालय पुर्नवसन विभाग यांच्याकडे भरणार असा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला असुन तो लवकर मंजुर करण्याचे आदेश आमदार श्री.राजेश एकडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी माननिय आमदार श्री.राजेशभाऊ एकडे,कार्यकारी अभियंता श्री.हजारे साहेब , शिवसेना जिल्हा प्रमुख (उबाठा) श्री.वसंतरावजी भोजने, श्री.पुरुषोत्तम झालटे, सदस्य जिल्हा पुर्नवसन समिती, बुलढाणा, श्री.भानुदास तितरे संचालक कृऊबास नांदुरा, श्री.गणेश काटे सरपंच दादगाव, श्री.अतुल पाटील, श्री.परम जुनेजा साहेब कार्यकारी अभियंता खामगांव, सौ.कल्याणी मॅडम उप कार्यकारी अभियंता शेगांव, श्री.विजय चोपडे, श्री.योगेश बोरकर, श्री.राहुल बारापत्रे, माणिक पाटील,शशिकांत गव्हाड, नारायण बघे, दिलीप विपळतकार,विलास तितरे विकास सोनोने , अनिल धुंदळे, मिलींद तेलंग, शाहीर हरीभाऊ वेरुळकार यांच्या गावातील प्रकल्पग्रस्त मोठया संख्येने उपस्थित होते.