Phoenix Maharashtra

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ४ विशेष रेल्वेगाड्या

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, आणि मलकपुरात असणार थांबा

शेगांव : मध्य रेल्वेकडून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर ते मुंबई आणि पुणे/सोलापूर ते नागपूर ४ विशेष गाड्या चालविण्यात येणार असून या गाड्यांना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, आणि मलकपुरात थांबा असणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून प्राप्त झाली आहे. नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२३ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर ते मुंबई आणि पुणे/सोलापूर ते नागपूर या ४ एकेरी विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालविण्यात येणार आहे. नागपूर- मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ०१०१८ वन वे स्पेशल २० कोच नागपूर येथून २४ ऑक्टोबरला २०:०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १२:०० वाजता पोहोचेल. ही गाडी नागपूर, अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे थांबेल. नागपूर- पुणे वन वे ०१०३० एकेरी विशेष गाडी २४ ला नागपूर येथून २३:०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १७:४५ वाजता पोहोचेल. नागपूर, अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड मार्ग आणि पुणे येथे या गाडीला थांबा असेल. नागपूर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस वन वे स्पेशल २४ कोच ०१०३२ एकेरी विशेष गाडी २५ ला नागपूर येथून १५:०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई थांबेल. येथे दुसऱ्या दिवशी ०८:१५ वाजता पोहोचेल. नागपूर, अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे थांबेल. सोलापूर-नागपूर वन वे स्पेशल २४ कोच ०१०२९ एकेरी सुपरफास्ट स्पेशल २४ ला २०:२० वाजता सोलापूर येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १३:०५ वाजता पोहोचेल. सोलापूर, कुरुडवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा आणि नागपूर येथे पोहचेल. आरक्षित डब्यांचे तिकीट बुकिंग आज पासून सुरू झाली असून प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version