शेगांव : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा काँग्रेसचे नेते रामविजय बुरुंगले यांची काँग्रेस प्रती पक्षनिष्ठा व त्यांचे भरीव कार्य पाहता मध्यप्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी हरदा जिल्ह्यातील तिमरणी विधानसभा क्षेत्रासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा मध्यप्रदेश चे संयुक्त प्रभारी संजय दत्त यांनी एका पत्राद्वारे ही नियुक्ती केली असून त्यामध्ये नमूद केले आहे की, मध्य प्रदेशचे प्रभारी एआयसीसी सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांच्याशी झालेल्या चर्चे व मान्यता नुसार आपली मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2023 साठी हरदा जिल्ह्यातील 134 तीमरणी विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तात्काळ सदर मतदार संघात पोहोचून निवडणूक प्रचार संपेपर्यंत तेथे राहून निवडणूक मोहिमेच्या सर्व पैलूंचे समन्वय आणि निरीक्षण करून तसा अहवाल सादर करावा असे नियुक्ती पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. नियुक्तीचे पत्र प्राप्त होताच पक्ष नेते रामविजय बुरुंगले हे मध्यप्रदेश रवाना झाले आहेत. या नियुक्तीचे श्रेय ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांना देतात.
मध्यप्रदेश निवडणुकीसाठी रामविजय बुरुंगले यांची निरीक्षक पदी नियुक्ती
