Phoenix Maharashtra

स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुगृह अनुदान योजनेअंतर्गत धनादेश वाटप

मलकापूर : स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुगृह अनुदान योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू पावलेल्या मलकापूर तालुक्यातील ३ शेतकऱ्यांच्या वारसास आर्थिक सहाय्य म्हणून दोन लाख रुपयांचा धनादेश आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सलमाबी गुलाब खान पठाण रा. उमाळी, संतोष अशोक खाचणे या. दुधलगाव खु.व गणेश शंकर पाटील रा.दाताळा या तीन शेतकऱ्यांचा यावर्षी अपघाती मृत्यू झाला होता. या अपघाती मृत्यू प्रकरणी मृत्यूप्रकरणी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. आमदार राजेश एकडे यांनी या प्रस्तावांचा पाठपुरावा केला असता शासन स्तरावरून सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तर आज २० ऑक्टोंबर उपरोक्त उपरोक्त तिन्ही अपघाती मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसास आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते प्रति वारस दोन लाख रुपये याप्रमाणे सहा लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी सूर्यवंशी, काँग्रेस तालुकाध्यक्ष बंडूभाऊ चौधरी, बाजार समितीचे संचालक प्रवीण पाटील, अनिल भारंबे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Exit mobile version