बँकेला १ कोटी ७५ लाख रुपयांचा चुना
शेगावात दोघांविरोधात गुन्हा दाखल
शेगांव : बँकेत गहाण ठेवलेल्या प्लॉटची खोटी कागदपत्रे तयार करून ती परस्पर विकून पतसंस्थेला १ कोटी ७५ लाख रुपयांचा चुना लावणाऱ्या शेगावच्या दोघांविरोधात न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अमरावती शाखा अकोला या बँकेत शेगाव येथील अरुण विश्वनाथ भटकर राहणार रोकडे नगर आणि राजेश पारखेडे राहणार माऊली चौक शेगाव या दोघांनी आपल्याकडील प्लॉट सदर बँकेमध्ये गहाण ठेवलेले असताना परस्पर खोटी कागदपत्रे तयार करून हे प्लॉट लोकांना विकून सुमारे एक कोटी 75 लाख रुपयांचा चुना बँकेला लावण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आल्यावरून बँकेने न्यायालयात या संदर्भात धाव घेतली होती न्यायालयाने सदर प्रकरण तपासल्यानंतर दोन्ही आरोपीता विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे त्यानुसार शेगाव शहर पोलिसात रात्रीच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याचा पुढील तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव पोलीस हे करीत आहेत.