जळगाव जामोद : शेतातील रात्रिचा सिंगल फेज विज पुरवठा सुरु करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अभियंता जळगाव कार्यालयाकडे लेखी निवेदनातून केली आहे. गेल्या अनेक दिवसा पासून शेति पंपाचा रात्रीचा सिंगल फेज विज पुरवठा बंद आहे. पुढील आठवड्यात आता रब्बी ची पेरणी होऊ घातली आहे, त्या मधे हरभरा, कांदा, भाजीपाला इत्यादी पिकाची लागवड आपल्या भागात मोठ्या प्रमाणात केली जाते. पिकावर हरिणाच्या टोळी चे तूफान आक्रमण असते. या आक्रमनाला थोपविन्यासाठी शेतकऱ्यांना शेति मधे चोवीस तास जागता पहारा द्यावा लागतो. सर्व शेती सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने शेताच्या बाजुला घणदाट जगंल आहे. रात्रीच्यावेळी जंगलात जगंली जणावरांचे साम्राज्य असल्याने साप, विंचू, यांचे सह अस्वल,कोल्हा लांडगे,वेळ प्रसंगी बिबट्या आदि जणावारांचा मोठा जिव घेना धोका निर्माण होतो. हा धोका कधी कधी शेतकऱ्यांच्या जीवावर सुद्धा बेततो. त्यामुळे आदिवासी पट्ट्यात येत असलेल्या फिडरवरील कृषी क्षेत्रातील रात्रीच्या नियोजित थ्री फेज वेळापत्रकानुसार वीज पुरवठा सुरु होत नाही तो प्रर्यंत कृषी फीडर वरील सिंगल फेज वीज पुरवठा कायम सुरु करण्यात यावा,आणि कपाशी लागवड च्या काळात थ्री फेज वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा अन्यथा. आमचे रात्रीच्या वेळी जंगलात बरे वाईट झाल्यास संबंधित विभाग जबाबदार असणार, व कोणत्याही क्षणी कार्यलयावर आंदोलन करन्यात येईल असा इशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी निवेदनातून दिला आहे. या निवेदनावर सुरेश मुजलदा, तेजराव लोणे, विलास इंगळे, देवानन जाधव, प्रकाश धुर्डे, गजानन जामनकर, सतिष कनासे, प्रताप अखाड्या, रामसिंग खिराडे, राजेश भाबर, लालसिंग चंगोल, विजय चगोंल सह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
शेतातील रात्रिचा सिंगल फेज विज पुरवठा सुरु करा-स्वाभिमानीची मागणी
