खामगांव : बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची एन्ट्री झाल्यापासून घाटावरती व घाटाखाली अपर पोलीस अधीक्षक महामुनी व घाटाखालील अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कायदा – सुव्यवस्था यासोबतच गुन्हेगारांवर व गुन्हेगारीवर आळा बसवण्यात चांगलेच यश आले आहे. मात्र खामगाव शहरातील त्या तीन कर्मचाऱ्यांमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाचक्की होताना दिसून येत आहे. काही दिवसाआधी खामगांव शहरातील शिवाजीनगर पोलिस स्टेशन मधील नेहमीच वादग्रस्त असणाऱ्या ३ खादाड पोलीस कर्मचाऱ्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा माजी वसुली अधिकारी तसेच काही महिन्या अगोदर अपघातग्रस्त झालेला तसेच त्या ” घंटी” व “बबली” चा , त्याच्याही काही वर्षा अगोदर फोटो व्हायरल झालेल्या”घंटी” वाजवणाऱ्याने लाखोंची तडजोड करून नकली नोटांचे प्रकरण दाबून टाकले आहे. त्यामुळे ते तीनही कर्मचारी “घंटी” वाजवत “प्रफुल्लित” होऊन “गजगजून” पुन्हा एकदा जिल्हाभरात चर्चेला आले आहेत. खामगाव शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या चर्चेनुसार प्रकरण 20 ते 25 दिवसाआधीचे आहे. “त्या” तीन पैकी नेहमी चर्चित राहणाऱ्या व जिथे तिथे आपली लुडबुड करत “घंटी” वाजवत राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांला एका घरात नकली नोटा असल्याची माहिती प्राप्त झाली. ती माहिती मिळताच त्यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांना ज्यातील एक सिक लिव्हर आहे व एक नेहमीच सिंघम स्टाईल मुछ घेऊन वावरणाऱ्या जिगरी मित्र असलेले या दोघांनाही घेऊन शांततेची “घंटी” वाजवत हे तिघेही कर्मचारी नकली नोटा ठेवलेल्या आरोपीच्या घरी पोहोचले होते. तिथे पोहचल्यावर त्यांनी कारवाई करणे किंवा वरिष्ठ अधिकारी यांना कळवणे अपेक्षित असताना तसे न करता त्यांनी तिथे त्या घरातील पलंगा खाली ठेवलेल्या तीन बॅगा उघडून पाहिल्या व ज्या आरोपीच्या घरी नकली नोटांच्या या तीन बॅगा ठेवल्या होत्या त्याबाबत त्याला विचारणा केली असता त्याने हमारा “बजाज” चे नाव सांगितले व तात्काळ त्याला बोलवण्यास निरोपही दिला पहिले तर हमारा “बजाज” त्या घरी आल्यावर ती सदरचा ठेवलेला माल हा माझा नसून “ज्ञान” देणाऱ्या “जांगड” गुत्त्याचा असल्याचे सांगितले. सदरचा नकली नोटाचा माल “ज्ञान” देणाऱ्याचा असल्याबरोबरच समजल्यावर नेहमीच शहरात “घंटी” वाजवत फिरणाऱ्याच्या मनात लालसा निर्माण झाली व त्यांनी तात्काळ त्या “ज्ञान” देणाऱ्या “जांगड” गुत्त्याला ताबडतोब फोन केला व त्या “जांगड” गुत्त्याने सांगितल्याप्रमाणे आपली “ठाकूरकी” दाखवत “लख्ख” बाबत कोणालाही काहीच सांगणार नाही व याची वाच्यता सुद्धा कुठेच करणार नाही या बोलीवर लाखो रुपयांची मलिदा “घंटी” वाजवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत ताबडतोब हात मिळवणी करून घेतली व नकली नोटांचा माल त्या ठिकाणावरून तात्काळ दुसरीकडेच म्हणजेच चिखलीला पाठवण्यास “ज्ञान” देणाऱ्या “जांगड”गुत्त्याला सांगितले. मात्र त्यातील “ठाकूरकी” दाखवणाऱ्याने शेवटी हमारा “बजाज” ला न कळवता या गोष्टीची वाचता गावात सुरू केली व त्यामुळे हे प्रकरण बाहेर आले. त्या नकली नोटा ठेवणाऱ्याने “ठाकुरकी” दाखवली नसती तर नक्कीच हे प्रकरण दाबण्यात “घंटी” वाजवणाऱ्या कर्मचारी व त्याच्या दोन सहकाऱ्यांना यश आले असते व त्यांची दिवाळी सुद्धा आनंदात गेली असती. त्यामुळे आता या “घंटी” वाजवणाऱ्या व त्याच्या दोन सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांवरती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने नक्कीच त्यांना “प्रफुल्लित” करून “गजगजुन” कारवाईचा “बडगा” त्यांच्यावर उचलतील का हे सुद्धा आता यावेळेस पहावे लागणार आहे. या प्रकरणांमध्ये शिवाजीनगरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा हात वर करून या प्रकरणाची खोटी चर्चा कोणी केली असल्याची नवीनच शक्कल लढवली आहे. त्यामुळे या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांचा संपूर्ण सीडीआर काढून व त्या तिघांचा सेटलमेंट मधील मागील प्रकरणाचा संपूर्ण रेकॉर्ड काढून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता खामगाव शहरातील नागरिकांकडून होत असल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या 20 ते 25 दिवसांपूर्वी झालेल्या घटनेची वाच्यता झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून “घंटी” वाजवणाऱ्या सह त्याच्या दोन मित्रांवर सुद्धा तात्काळ कारवाई करायला हवी होती मात्र आपलेच पोलीस कर्मचारी जर असे काम करत आहे तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना उशीर का होत आहे हा सुद्धा एक चर्चेचा विषय संपूर्ण जिल्ह्यात बनला आहे. याच जागेवर एखादा सामान्य व्यक्ती पोलिसांना भेटला असता तर कुठल्याही प्रकारची चौकशी न करता तात्काळ त्याच्यावरती गुन्हा दाखल करून कारवाई केली असती, मात्र ते म्हणतात ना “आपला तो बाबू दुसऱ्याचे ते कारटे” असाच काही प्रकार जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने या प्रकरणात करताना दिसून येत आहेत. सदरचा विषय पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्यापर्यंत भरपूर दिवसा अगोदर पोहोचलेला असून त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांना चौकशीच्या सुचना सुद्धा दिल्या होत्या. त्यानंतर त्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आले होते व त्यानंतर नकली नोटा प्रकरणातील आरोपी असणाऱ्या “ज्ञान” देणाऱ्या “जांगड” गुत्त्याला व “ठाकूरकी” करणाऱ्याला सुद्धा अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात व शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. खामगावात याआधीही बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आले आहे. या कथित प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांनी ज्यांच्याशी तडजोड केली आहे त्या खामगावचे रहिवासी असलेल्या तिघांवर फेब्रुवारी २०२३ ला हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात बनावट नोटा देऊन महिलेची फसवणूक करण्याचा गुन्हा दाखल आहे. १ लाख रुपयांचे ३ लाख देतो असे आमिष खामगावच्या तिघा भामट्यांनी महिलेला दाखवले होते. त्या भामट्यांनी ४० लाख रुपयांच्या नकली नोटा असलेली बॅग महिलेच्या ताब्यात देऊन पोबारा केला होता. नाकाबंदी करून पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. या प्रकरणानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्या आरोपींच्या खामगाव येथील घरातून ७५ लाख रुपयांच्या बनावट नोटा आणि बनावट सोने जप्त केले होते. ज्याच्या गुन्हा दाखल आहे तो आरोपी सध्या चर्चेत असलेल्या कथित बनावट नोटा प्रकरणाशी संबंधित असल्याची चर्चा खामगांव शहरात सुरु आहे. खामगावच्या या कथित नकली नोटा प्रकरण दाबण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांकडून आर्थिक देवाणघेवाण झाली असल्याचे नक्कीच दिसून येत आहे मात्र अजून पर्यंत ही जिल्हा पोलीस अधीक्षक या तिघांनाही कारवाईपासून वाचवण्याचा प्रयत्न का करत आहे..? हे एक न उलगडणार कोड दिसून येत असल्याची चर्चा खामगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्याभरात होताना दिसून येत आहे.
नकली नोटा प्रकरणातील त्या 3 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांची का होते आहे टाळाटाळ ?
RELATED ARTICLES