Phoenix Maharashtra

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा 4 तर काँग्रेसच्या व वंचीतच्या हाती 1 ग्रामपंचायत

खामगांव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा बोलबाला

आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या विकास कामांना जनतेचा कौल.

खामगांव : खामगांव विधानसभा मतदार संघात आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात मतदार संघात सुरु असलेल्या विकास कामांना जनतेने कौल दिला असून खामगांव तालुक्यातील एकुण 6 ग्रामपंचायत निवडणुकीपैकी जनतेतून सरपंच पदाच्या निवडणुकीत 6 पैकी 4 गावात भाजपाचे सरपंच बहुमताने निवडून आले. तर काँग्रेसला व वंचितला प्रत्येकी एक सरपंच निवडून आला आहे. यातून भाजपाने खामगांव विधानसभा मतदार संघात आले वर्चस्व़ सिध्द़ केले आहे. दि.06 नोव्हेंबर 2023 रोजी तहसिल काया्रलयावर सदरची मतमोजणी पार पडली. खामगांव तालुक्यातील रोहण, गेरु माटरगांव, अटाळी, जयपूर लांडे, घारोड, जयरामगड या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकी तर लोणी गुरव येथील पोट निवडणुक पार पडली. यावेळी महायुती सरकारच्या निर्णयाने पुन्हा जनतेतून सरपंच निवड करण्यात आली. त्यामुळे या निवडणुकीला वेगळेच महत्वप्राप्त़ झाले आहे. अत्यंत चुरसीच्या समजल्या जाणाऱ्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारत 6 पैकी 4 जागेवर आपले सरपंच निवडून आणले तर काँग्रेस आणि वंचीतला केवळ 1-1 जागेवर विजय मिळविता आला. तालुक्यातील रोहणा येथे अनुसुचित जाती प्रवर्गातील महिलेकरीता पद राखीव होते या निवडणुकीत संतोष गव्हाळे यांनी 586 मते घेऊन विजय मिळवला. गेरु माटरगांव ग्रामपंचायतच्या सरपंच पदी गोकर्णा अशोक जगताप यांनी 554 मते मिळवून विजय मिळविला आहे. जयपूर लांडे येथे सरपंच पदी भारती गोपाल लांडे यांनी 637 मते मिळवून विजय मिळविला. घारोड ग्रामपंचायत संरपंच पदी वैभव किशोर ठाकरे यांनी 716 मते मिळवून विजय मिळवला असून या चारही ग्रामपंचायत वर भाजपाचे सरपंच निवडून आले आहेत. तर मतदार संघातील अटाळी व जयरामगड यादोन ग्रामपंचायत वर अनुक्रमे काँग्रेस व वंचीतचे संरपंच निवडून आले आहेत. या निवडणुकीतून भाजपाने खामगांव विधानसभा मतदार संघावर पुन्हा आपले वर्चस्व़ सिध्द़ केले आहे.

Exit mobile version