खामगांव : स्थानिक श्री जी वी मेहता नवयुग विद्यालयात २००५ पुर्वी च्या माजी विद्यार्थी मेळावहेंबर २०२३ रोजी श्री जी. वी. मेहता नवयुग विद्यालयाचे प्रांगण येथे आयोजीत करण्यात आला आहे. तसेच माजी विद्यार्थ्यांनी शाळेला दिलेल्या देणगीच्या रकमेतुन विद्यालयात सौरउर्जा विद्युतीकरण प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. देश- विदेशात विद्यालयाचे विद्यार्थी आपली किर्ती स्थापन करत आहेत. या विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीमुळे आज विद्यालयात भव्य सौर विद्युत प्रकल्प उभा राहत आहे. याचे समाधान माजी विद्यार्थ्यांस दिसुन येत आहे.
सदर मेळाव्यात सकाळी ८.३० ते ९.३० नोंदणी व एकत्रीकरण, सकाळी १०.०० वाजता उदघाटन व सेवानिवृत्त गुरुजनांचा सत्कार, दुपारी १२.३० वाजता सांस्कृतीक कार्यक्रम, दुपारी १.०० वाजता सहभोजन, दुपारी २.३० वाजता माजी विद्यार्थी संवाद व दुपारी ४.०० वाजता मेळाव्याचा समारोप राहिल. सदर मेळाव्याच्या उदघाटन सत्राचे प्रमुख वक्ते शैलेशजी जोशी, पश्चिम क्षेत्र प्रांत संघटनमंत्री, विद्याभारती प्रमुख पाहुणे किसनराव अवचार, सेवानिवृत्त अभियंता महावितरण, १९५७ च्या बॅचचे गुणवंत माजी विद्यार्थी व अध्यक्ष प्रभाकरराव बुराडे, उपाध्यक्ष खामगांव एज्युकेशन सोसायटी, खामगांव यांची उपस्थिती लाभणार आहे. सदर माजी विद्यार्थी मेळाव्यात सहभाग हा निःशुल्क आहे. तरी २००५ च्या पुर्वीच्या माजी विद्यार्थी यांनी मेळाव्यात सहभाग घ्यावा. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विजयराव देशपांडे, सचिव महादेवराव भोजने व प्राचार्य सुनिल जोशी यांनी केले आहे.