खांमगाव : तालुक्यातील मरीमाता देवी संस्थान मौजे विहिगाव,निळेगाव रामनगर हिंगना कारेगाव पेड़का पातोंडा येथे आज सकाळी अमोल महाराज क्षीरसागर तीर्थक्षेत्र अटाली यांचे हस्ते विधिवत पूजा अर्चना करून श्री हभप संजय महाराज अलोने आलंदी देवाची यांचे शुभ हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर काल्याचे कीर्तन करून महाप्रसाद वितरित करून सांगता करण्यात आली. संजय महाराज अलोने आलंदी देवाची यांनी मरीमाता मन्दिराला मूर्ति स्वखर्चातुन मूर्ति भेट दिली व मोफत काल्याचे कीर्तनसुधा केले यावेळी संस्थानचे वतीने महाराजांचे आभार मानण्यात आले संस्थांच्या विश्वस्त मंडळींकडून सत्कार करण्यात आला. पण तोहि महाराज यानी विनम्रतापूर्वक नाकारला व माझा सत्कार कशाला धर्म कार्य करत असताना वारकरी धर्म पैसे घेवून देव करायला सांगत नाही त्यामुळे सत्कार नको असे त्यांनी आवर्जून सांगितले यावेळी प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्य आमदार आकाश दादा फुंडकर यांचे वतीने सोशल मीडिया प्रमुख भाजपा सागरदादा फुंडकर माजी आमदार राणा दिलीपकुमार सनन्दा साहेब युवा सेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ऋषि जाधव सभापति कृषि उतपन्न बाजार समिति सुभाष पाटिल संचालक संघपाल जाधव कॉंग्रेस सेवा दल जिल्हाअध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण शरद गायकी यांचेसह अनेक मान्यवरानी भेंट दिली यावेळी संस्थानचे वतीने रवि महाले शिवाजीराव चव्हाण यांचेकड़ून त्यांचा शाल श्रीफल देवून सत्कार करण्यात आला गावकरी मंडळीं सोबत संस्थानचे पधादिकारी उपस्थित होते तेजेंद्रसिंह चव्हाण, शिवाजीराव चव्हाण, रविभाऊ महाले, जयराम मुंडाले, गजानन मेसरे, देवीदास पाचपोर, विट्ठल पाचपोर,विनोद पाटिल, गणेश पाटिल, दिनेश पाटिल, रेवनसिंग चव्हाण, सुनील राउत, शंकर राउत, नामदेव फुंडकर, शुभम आखरे, टुन्ना पाटिल, मिथुन पाटिल, रवि राउत, दामोदर कवडकार, पुरुषोत्तम दहीभात,सतीश चव्हाण, सुभाष पाटील, शालिग्राम भटकर, शिवामहाराज शिसोदे, विक्की चव्हाण, वीरेन्द्र चव्हाण, विलास पाटिल, ज्ञानदेव लगर, शैलेन्द्र चव्हाण, बालासाहेब त्रिकाल पाटिल, हभप एकनाथ महाराज पाटिल, नितिन त्रिकाल, प्रकाश पाटिल, किसना मेसरे, किशोर कडाले यांच्यासह रामनगर निळेगाव, हिंगणा, कारेगाव,विहिगाव, पेड़कापातोंडा येथील नागरीक व मरीमाता भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.