Wednesday, July 16, 2025
No menu items!
spot_img
Homeशिक्षणएस.टी.बस सुरु करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या स्थानकप्रमुखांच्या कॅबिन मध्ये ठीय्या

एस.टी.बस सुरु करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या स्थानकप्रमुखांच्या कॅबिन मध्ये ठीय्या

शेगाव : तालुक्यामध्ये येणाऱ्या आळसना ते शेगाव या मार्गावर असलेल्या रेल्वे फाटक रेल्वे प्रशासनाने आठ दिवसापूर्वी कायमचे बंद केले आहे. यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आले असून या भुयारी मार्गाचा अवलंब वाहन चालकांनी करावा असे गृहीत असताना अद्याप पर्यंत एसटी बसेस या भुयारी मार्गातून गावात पोहोचत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आज संतप्त गावकऱ्यांचा विद्यार्थ्यांनी शेगाव येथील बस स्थानकावर स्थानक प्रमुख आणि आगर प्रमुखांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यामुळे आगार प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती. शेगाव तालुक्यातील आळसना या गावाजवळ इंग्रज कालीन रेल्वे फाटक असून या फाटकातून तालुक्याच्या ठिकाणी एसटी बस ये जा करतात मात्र आठ दिवसापूर्वी रेल्वे प्रशासनाने या भागांमध्ये भुयारी मार्ग तयार केल्याने रेल्वे फाटक कायमचे बंद केले आहे मात्र सदर भुयारी मार्ग अरुंद असल्याने एसटी बसेस यातून जात नसल्याचा निर्वाळा चालकांनी दिल्याने एसटी बसेस बंद करण्यात आले आहेत त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होत आहे दरम्यान आज गुरुवारी आळसना गावाचे सरपंच पती आमिर खान आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शेख अमिन यांच्या नेतृत्वामध्ये गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांनी वाहनाद्वारे बस स्थानक गाठून ठिय्या आंदोलन केले यावेळी स्थानक प्रमुखाच्या केबिनमध्ये विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला मात्र स्थानिक प्रमुख यावेळी उपस्थित नसल्याने बराच वेळ विद्यार्थ्यांनी येथेच ठिय्या मांडला. दरम्यान आगार प्रमुखांनी विद्यार्थी व गावकऱ्यांना आपल्या केबिनमध्ये बोलावून या संदर्भात चर्चा भुयारी मार्गातून एसटी बस चालवण्यासाठी समर्थ आहे का याचा प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय या गावाकरिता बसेस सुरू होणार नाही असे आघार प्रमुखांनी सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला दरम्यान चर्चेतून मार्ग काढून सांगव्या फाट्यावरून विद्यार्थ्यांसाठी एसटी बस या गावाकडचा पाठवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला यानंतर हे ठिय्या आंदोलन समाप्त करण्यात आले यावेळी सरपंच सुर्वत परवीन अमीरखान, जियाउल्लाखान, शेख मुख्तार यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments