Saturday, June 21, 2025
No menu items!
spot_img
Homeसामाजिकमाजी नगरसेवक प्रवीण कदम यांनी केला महावितरणाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार

माजी नगरसेवक प्रवीण कदम यांनी केला महावितरणाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार

खामगांव: दरवर्षी गणेशोत्सव सोहळा संपूर्ण खामगांव शहरातील विविध भागातील मंडळे अतिशय आनंदोत्सवात साजरा करीत असतात. तसेच गणेशोत्सव काळातील विसर्जन मिरवणूका या सुध्दा भव्य दिव्य प्रमाणात काढण्यात येतात. अनेक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने उंच मूर्तीची स्थापना करण्यात येते. मिरवणूक मार्गातून या मुरतींना काही त्रास किंवा धोकादायक विद्युत अडथळे निर्माण होऊ नये या उद्देशाने महावितरणचे अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन सुचना देऊन मिरवणूक मार्गातील धोकादायक लोंबकळलेल्या विद्युत तारा रोड क्राॅस तारा काढून विविध ठिकाणी नवीन पोल उभारून केबल टाकण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून या वर्षीच्या गणेशोत्सव काळात माऊली वीरेंद्रजी जस्मदीया ( कार्यकारी अभियंता महावितरण)
शैलेशजी मुळे ( अतिरिक्त कार्यकारी अभियंता) यांनी या विषयाची दखल घेऊन गणेश ऑईल मील ते मस्तान चौक मिरवणूक मार्गातील तसेच ब-याच ठिकाणचे लोंबकळलेल्या विद्युत तारा काढून नवीन पोल उभारून केबल टाकण्याचे कार्य खुप कमी वेळात कायम स्वरूपी मार्गी लावल्याबद्दल त्याच प्रमाणे काही दिवसातच संपूर्ण भारतातून एकमेव खामगांव शहरामध्ये आई जगदंबा शांती उत्सवाला सुरूवात होणार आहे. हा उत्सव सुध्दा शहरामध्ये विविध मंडळांव्दारे व शहरवासीयांच्या वतीने मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असतो. गणेशोत्सव मिरवणूक मार्गाप्रमाणेच आई जगदंबा शांती उत्सवाचा परंपरागत मिरवणूक मार्ग, श्री हनुमान व्यायाम मंडळ प्रवेशद्वार ते श्री हनुमान मंदिर सती फैल ते बरडे प्लाॅट चौफुली मिरवणूक मार्गातील लोंबकळलेल्या विद्युत तारा काढून विविध ठिकाणी नवीन पोल उभारून केबल टाकण्याचे कार्य उत्सवा पुर्वी करण्यात येईल असा विश्वास दिल्याबद्दल
वीरेंद्रजी जस्मदीया कार्यकारी अभियंता, शैलेशजी मुळे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांचे माजी नगरसेवक प्रविण कदम यांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन आभार व्यक्त करण्यात आले.
या वेळी गौरव सावरे शासकीय कंत्राटदार. मो. नावेद. मो. जुबैर. शुभम सुकाळे. निलेश बाप्पु देशमुख. संतोष हिंगणकर. स्वप्निल ताथोड या सह अनेक कर्मचारी यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments