Saturday, June 21, 2025
No menu items!
spot_img
Homeउद्योगविकास काम पंधरवाडा अंतर्गत ग्रामीण भागात २१ कोटी रुपयाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा...

विकास काम पंधरवाडा अंतर्गत ग्रामीण भागात २१ कोटी रुपयाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

खामगाव : भारताचे पतप्रधान विश्व नेते नरेंद्र मोदी याच्या वाढदिवसानिमित्य सेवा समर्पण विकास पंधरवाडा अतर्गत २१ कोटी रुपयाचा विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा खामगाव विधान सभा चे आमदार अड आकाश फुंडकर याच्या हस्ते पार पडला यावेळी सागर फुंडकर याची विशेष उपस्थिती होती.
शहरी भागासह ग्रामीण भागात विकास कामे जोमाने सुरु असून आमदार आकाश फुंडकर याच्या नेतृत्वात पाणी पुरवठा योजनाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. येत्या काळात सर्वांना मुबलक पाणी मिळणार तसेच कोणाला ही पाण्या साठी भटकंती नाही करावी लागणार असे मत आमदार आकाश फुंडकर यांनी कार्यक्रम दरम्यान व्यक्त केले. आगामी काळात देखील विकास काम झपाट्याने सुरु राहणार असल्याचे ते बोलत होते .
विकास कामा मध्ये ग्रामीण भागातील् घाटपुरी येथील रस्ता बांधकाम करणे १० लक्ष रु , नाली बांधकाम करणे १२ लक्ष रु. खुटपुरी येथील पाणी पुरवठा योजना १२४.६० लक्ष रु हनुमान मंदिर ते सुनिल घोरपडे नाली बांधकाम करणे ५ लक्ष रु शिरजगाव दे.येथे जनता नगर पाणी पुरवठा योजना १३०.५३ लक्ष, माथनी येथे पाणी पुरवठा योजना १२७.३८ लक्ष
सजनपुरी येथील पोचरस्ता बांधकाम करणे १३ लक्ष रु.हनुमान मंदिर सभामंडप ५ लक्ष रु. जनुना येथे हनुमान मंदिर ते सुळोकार रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष रु टेंभुर्णा येथील सभामंडप बांधकाम करणे १० लक्ष रु , पाणी पुरवठा योजना ३३२.३६ रु ,शेलोडी येथे पाणी पुरवठा योजना १९०.६७ रु.ग्रामा-४ शेलोडी ते राममा ५३ रस्ता सुधारणा करणे २ किमी १२८.००. पिंप्री गवळी येथे पाणी पुरवठा योजना ९३.०० , कारेगाव येथे हनुमान मंदिर जवळ सभामंडप करणे ५ लक्ष रु.पंचमठी जवळ सभामंडप पाणी पुरवठा योजना १० लक्ष रु प्राजिमा ५९ अंबिकापूर फाटा ते चितोडा- पळशी-कदमापूर- लोणी रस्ता रुंदीकरणासह सुधारणा ८५०.०० श्री गजानन महाराज मंदिर सभामंडप १०.लक्ष रु, अबिकापूर श्री महादेव मंदिर सभामंडप १० लक्ष रु.
इत्यादी कामाचा भूमिपूजन सोहळा धूमधडाक्यात् सुरु असून खामगाव तालुक्याचा कायापालट होणार असल्याचे बोलल्या जात आहे. यावेळी शरदचंद्र गायकी, सुरेश गव्हाळ, विनोद टीकार डॉ एकनाथ पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेवराव महाले ह भ प सुपेकर महाराज सरपंच विष्णु कुलसुंदर , उपसरपंच योगेश कोल्हे , मुन्ना दळवी , सुनिल वानखडे , विजय महाले , गोपाल ढोले , गोपाळ महारखडे , ग्रामपंचायत सदस्य विशाल झनके , आकाश कुलट , सौ . अलका दळवी , सौ सपना तायडे , सौ . वैशाली जाधव , मंगेश टोपरे , निखिल तायडे , शिवहरी कोठे , सहदेव महाले , काटे काका , ज्ञानेश्वर कुटे , दीपक कुलट याच्यासह ग्रामपचायत सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामीण भागातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला भगिनी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments