भाजपच्या वतीने शोभायात्रेचे भव्य स्वागत
खामगाव : आ. अँड. आकाश फुंडकर यांनी जयंती निमित्त महाराजा अग्रसेन यांना अभिवादन केले, भाजपच्या वतीने अग्रवाल समाजाच्या वतीने आयोजित शोभायात्रेचे स्वागत भाजपच्या वतीने करण्यात आले. अग्रवाल समाजाच्या वतीने आज 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी महाराजा श्री अग्रसेन यांच्या जयतीनिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेचे स्वागत भाजपच्या वतीने अर्जुन जल मंदिर जवळ करण्यात आले. खामगाव मतदार संघाचे लाडके आमदार अँड आकाश फुंडकर यांनी महाराजा श्री अग्रसेन यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांचेसह भाजप महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सह संयोजक सागरदादा फुंडकर, भाजप ज्येष्ठ नेते दर्शनसिंह ठाकूर, माजी न प उपाध्यक्ष मुन्ना पुरवार, जिल्हा सरचिटीनिस शरद गायकी, संजय शिनगारे,डॉ एकनाथ पाटील , शेखर पुरोहित, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, राकेश राणा,विद्यार्धी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख,राजेंद्र धनोकार, सतीशअप्पा दूडे, महादेवराव कांबळे ,वैभव डवरे, नागेंद्र रोहनकार, कृष्णा ठाकूर ,राजेश शर्मा डॉन,शंभू शर्मा, यश आमले, गोलू आळशी, विजय उगले, अँड वाधवाणी, आदित्य जोशी, आकाश बडासे, अनिल मेतकर, बंटी खंडेलवाल, दया कारंजकर, दिपांशू भैय्या, जितेंद्र पुरोहित, गौरव माने, विक्की हट्टेल, अमोल राठोड, हितेश पदमगिरवार, गुरप्रित, विजू आनंदे, गजानन मुळीक, नितीन पोकळे, प्रसाद एडलाबादकर, अविनाश कोल्हे, राजेश इंगळे, संजय गुप्ता, देशमुख, मेहुल जाधव, श्रीकांत जोशी, सोनू नेभवानी, विनय पांडा शर्मा, मुकेश फुंडकर, नरेश पमनानी, पवन पोलाखरे, संजय भागदेवानी, विक्की चौधरी, प्रसन्न पिसे पाटील, राम शिंदे, संतोष गुरव, संदीप राजपूत, रोशन गायकवाड, रोमीत जवकार,जितेंद्र सिंघ मेहरा, योगेश कोल्हे, संतोष येवले,कल्पेश बजाज, शशांक वक्ते, विकास चवरे, आदी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी महाराजा श्री अग्रसेन यांना अभिवादन केले व शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी भाजयुमो व विद्यार्थी आघाडी च्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली व महाराजा श्री अग्रसेन यांच्या घोषणा करण्यात आल्या. याप्रसंगी आ. अँड. आकाश फुंडकर, सागरदादा फुंडकर व भाजप पदाधिकऱ्यांनीही शोभायात्रेत सहभागी अग्रसेन समाज बांधवांच्या भेटी घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.