अखेर तो दिवस आला….
खामगांव : १९ जानेवारी २०२३ पासून आम्ही बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव येथुन साप्ताहिक फिनिक्स महाराष्ट्र वृत्तपत्र सुरु केले आहे. यात अजून थोडीशी भर पडावी याकरिता तसेच लोकांपर्यंत अधिकाधिक जलद गतीने पोहोचता यावे याकरिता फिनिक्स महाराष्ट्र नावाने वेबसाईट सुरू करण्याचा ध्यास आम्ही घेतला होता आणि आज सगळ्यांना सांगताना आनंद होत आहे की, घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात फिनिक्स महाराष्ट्रच्या वेबसाइटचे अनावरण एका वीडियो प्रोमो द्वारे करण्यात आल. फिनिक्स महाराष्ट्राच्या वेबसाईट अनावरून प्रसंगी धम्मपाल नितनवरे, भारत इंगळे, राहुल गवई प्रामुख्याने उपस्थित होते. शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, सामान्य जनतेच्या विश्वासाने आम्ही आमच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला व समाजातील सर्व सामान्य घटकांना नेहमी न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. अशातच काहीतरी नविन करायचा आमचा विचार होता. नवनवीन विषय, विचार, प्रबोधन, मार्गदर्शन व आपल्या नवनवीन विषय, विचार, प्रबोधन पेपरच्या माध्यमातून आम्ही मांडत असतो. मात्र बदलत्या काळाप्रमाणे अपडेट होण्याचा निर्णय आम्ही घेतला. आता वेबसाइट सुरु झाल्यावर नक्कीच आमची जबाबदारी अजुन वाढली आहे. पुढे याच माध्यमातून विविध प्रकारचे व नवनवीन विषयांवर लेख, बातम्या, ब्रेकींग, अपडेट, विविध विषयावर विश्लेषण देऊन अनेक नवीन लोकांच्या मनाशी जुळून संवाद करण्यासाठी फिनिक्स महाराष्ट्रने वेबसाईटची सुरुवात केली आहे. आम्ही फिनिक्स महाराष्ट्रच्या वेबसाइट वरुन महाराष्ट्रासह देशात जे काही घडते त्याचे सखोल विश्लेषण सुध्दा देऊन सत्य समोर आणायचा पुर्ण प्रयत्न सुध्दा करणार आहे. सामाजिक, राजकीय घडामोडी, सरकारी योजनांची अंमलबजावणी, महिलांचे प्रश्न, अनुसुचित जाती-जमातींवर होणारे अन्याय, बेरोजगारी, भ्रष्टाचार, इतिहासाची मोडतोड, आर्थिक साक्षरता, शिक्षण, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, जनसामान्य लोकांना न्याय मिळावा यासाठी लेखणीतुन नव्हे तर प्रत्यक्षात सुद्धा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या फिनिक्स महाराष्ट्रच्या वेबसाइटच्या माध्यमातून करणार आहे. फिनिक्स महाराष्ट्र वेबसाइट मधे आम्ही अजुन भरपूर गोष्टीचा यामधे समावेश सुद्धा आम्ही केला आहे. अश्याच नवनवीन अपडेट व चालू घडामोडी ‘जाणून घेण्यासाठी फिनिक्स महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट द्या.