खामगाव : कंत्राटी भरती वरून महाराष्ट्रात बेरोजगारी वाढविली आणि महाराष्ट्रातील तरुणांची दिशाभूल करणाऱ्या महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील तरुणांची माफी मागावी असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी केले. आज स्थानिक टॉवर चौकात भाजपच्या वतीने आ. अँड. आकाशदादा फुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या विरोधात विरोधात तीव्र निदर्शने केली व प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. कंत्राटी भरती वरून गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात गदारोळ सुरू आहे. महाराष्ट्रातील बोरोजगार तरुणांची दिशाभूल करून त्यांना महाविकास आघाडी रस्त्यावर उतरवून आंदोलन करायला लावत आहे. कंत्राटी भरतीचे आदेश वेळोवेळी काँगेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व उध्दव ठाकरे यांचे सरकारनेच काढले आणि भाजपची नाहक बदनामी करून महाराष्ट्रातील तरुणांची दिशाभूल करत आहे. महाविकास आघाडीचे काल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पितळ उघडे पाडले आणि कंत्राटी भरतीचा जी आर रद्द केला. भाजपची बदनामी करणाऱ्या महाविकास आघाडीच्या विरोधात आज तीव्र निदर्शने करण्यात आली व प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना खामगाव भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख म्हणाले की कंत्राटी भरतीचा पहिला आदेश 2003 मध्ये काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकारने काढला. त्यानंतर 2011 मध्ये पुन्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी तर 2021 उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना आपल्या सहिनिशी काढला. आणि स्वतःचे पाप झाकून महाराष्ट्रातील तरुणांची दिशाभूल करत त्यांना भाजप विरोधात आंदोलन करायला लावण्याचे काम केले. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी त्यांचे पितळ उघडे पाडून कंत्राटी भरतीचा जी आर रद्द केला. महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांची दिशाभूल करून संभ्रम निर्माण करणाऱ्या महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील तरुणांची व बेरोजगारांची माफी मागावी अन्यथा त्यांचे विरोधात आणखी तीव्र आंदोलने करू असे प्रतिपादन व इशारा त्यांनी यावेळी दिला. या आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, जिल्हा सरचिटणीस शरदचंद्र गायकी जिल्हा उपाध्यक्ष उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, ज्ञानदेवराव मानकर ,खामगाव विधानसभा प्रमुख संजय शिनगारे, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, राजेंद्र देवचे, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, शहराध्यक्ष शुभम देशमुख, माजी न प उपाध्यक्ष महेंद्र रोहनकार, महादेवराव कांबळे ,माजी नगरसेवक राजेंद्र धनोकार, विलासराव देशमुख ,गणेश सोनोणे,विलास काळे, विजय उगले सुरेंद्रकुमार पुरोहित, जितेंद्र पुरोहित, अशोक हत्त्तेल ,युवराज मोरे, नरेंद्र शिंगोटे , रामेश्वर चतरकार सत्यनारायण थानवी, महादेव मिरगे ,गजानन मुळीक, सुनील वानखडे, संदीप राजपूत ,संतोष येवले ,सुभाष इटणारे दत्ता जवळकर, अमोल राठोड रोहन, जयस्वाल, खेमाजी ,सतीश ताठे आधी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
भाजपच्या वतीने महविकास आघाडीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
RELATED ARTICLES