खामगांव : भारतात केवळ खामगाव शहर व परिसरात साजऱ्या होणाऱ्या मोठ्या देवीच्या शांती उत्सवाला आज सकाळी 9 वाजता मोठ्या उत्साहात आनंदच्या वातावरणामध्ये प्रारंभ करण्यात आला असून हा उत्सव 10 दिवस उत्साहात साजरा केल्या जाणार आहे.
खामगाव शहर व परिसरात जगदंबा मातेचा उत्सव कोजागिरी पौर्णिमेपासून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.आज शनिवार दि. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता मोठ्या देवीची पुजा अर्चा करून स्थापना करण्यात आली. यानंतर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. खंडग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे आज दुपारी ३ ते २९ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजे पर्यंत दर्शन बंद राहणार आहे. दरम्यान ४ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजेपासून महाप्रसादाचे वितरण होणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी सत्यनारायण प्रसादाचे वितरण होणार आहे. तर ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता जगदंबा मातेची आरती होवून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. आजपासून १० दिवस हा उत्सव चालणार आहे. या उत्सवात राज्यासह देशभरातून भाविक सहभागी होतात यामुळे जगदंबा उत्सवामुळे खामगाव शहराला पुढील १० दिवस यात्रेचे स्वरूप प्राप्त होणार आहे. अशी माहिती श्री जगदंबा सार्वजनिक मोठी देवी उत्सव मंडळाचे विश्वस्त यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. यासोबतच मोठ्या देवीसह शहर व परिसरात अनेक ठिकाणी सार्वजनिक मंडळांकडून जगदंबा देवीची स्थापना होणार आहे. त्याची संपूर्ण तयारी केली जात आहे. याकरीता परिसर सजविण्यात आला असून संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे.
खामगावात श्री जगदंबा शांती उत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ
RELATED ARTICLES