खामगाव : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व इन्चारा फाऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मुलींसाठी मानसिक आरोग्य जागृती उपक्रम राबविणे सुरु आहे. या उपक्रमाअंतर्गत जि . प . कन्या हायस्कूल खामगाव येथे दि .२७ ऑक्टोबर रोजी मानसिक आरोग्य कार्यशाळा घेण्यात आली .या कार्यशाळेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी जी.डी. गायकवाड यांनी केले तर अध्यक्षस्थानी बी.डी. खराटे सर होते. यावेळी उद्घाटनपर मनोगतातून गायकवाड साहेब यांनी या उपक्रमाचे महत्त्व सांगीतले. जिल्हास्तर मार्गदर्शक व समुपदेशक अरविंद शिंगाडे यांनी इयत्ता ६ वी ते १२ वी च्या विद्यार्थिनिंना ‘ मानसिक आरोग्य जागृती ‘ विषयक मार्गदर्शन केले. यामध्ये ‘भावनांची ओळख आणि व्यवस्थापन ‘ या घटकाविषयी माहिती, सादरीकरणातून प्रश्नोत्तरे व विद्यार्थिनिंचा कृतीयुक्त सहभाग घेण्यात आला. कार्यशाळेचे संचालन यु.जे.कुलकर्णी यांनी तर आभारप्रदर्शन व्ही. बी.खरात यांनी केले . कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक – शिक्षिका तसेच इयत्ता ६ वी ते १२ वी च्या सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या .